प्रवास होता, रोजचाच माझा
तोच रस्ता, त्याच वाटा
घडले जराशे, वेगळेच परंतु
मोह जडला या प्रवासाचा.
झाले असे एके दिनी
पहिले तुला मी खिडकीतुनी.
जीव जडला तुझ्यावरी
बाण लागला मज नजरेतुनी.
नवा झाला हा, प्रवास आता
तुझ्या दारी मी, येता जाता.
दिस कसला जो, तुजला न पाहता.
भरकटून गेली, माझी नवका.
तुला पाहिले, समोरी मी जेव्हा.
धाडसाने बोललो, तुज तेंव्हा
अवसान गळाले माझे परंतु
पाहुनी रंग, तूज चेहऱ्याचा तेंव्हा.
उत्तरे सारी सोबत ठेऊनी.
प्रश्न नवेच मज, गेलीस करुनी.
घायाळ मनाला सोबत घेऊनी
फिरतो आजही तुझ्या दारावरूनी.
आठवून पुन्हा तो प्रसंग आता
नशिबाला रोजच घालतो लाथा.
तुझ्या खिडकीच्या जवळून जाता
इतका खेळ झाला, बस तुला पाहता.
– प्रशांत