ना आलो तुझ्या दारी,
ना पाहिली मी वारी,
सूनी वाटली पंढरी,
आषाढीविना…..
घेतो दुरून निरोप,
न पाहता तुझे रूप,
यत्न केली मीही खूप,
तुझ भेटीसाठी…..
राउळी तू निवांत,
तुझ आवडे एकांत,
आमची ठेव भ्रांत,
देवा थोडी…..
येऊ दे, तुझे आमंत्रण,
येईल संसार सोडून,
पाहण्या तुझे मुख,
आवडीने…..
थांबतो आता थोडे,
मी एवढे बोलून,
घे पोटात चुका माझ्या
रखुमाई वल्लभा.
तुजवरी नसे राग,
तू जीवनाचा भाग,
आमच्यासाठीच पंढरीत तू,
पांडुरंगा……
प्रशांत
(२१/०७/२१)