पाऊसवेडी

पाऊसवेडी

खूपच पाऊसवेडी होती ती
प्रत्येक सर पावसाची ओंजळीत भरायची.
न बरसता जर गेले कधी ढग तर
त्यांच्यावर उगाचात रुसवा धरायची.

आभाळभरून आल्यावर अगदी
नवख्या कळीसारखी खुलायची.
पावसात चिंब भिजताना
थंडगार वाऱ्यासोबत झुलायची.

बरसणाऱ्या धरा अंगावर
झेलताना शहारून जायची.
‘येरे येरे पावसा…’ म्हणत तर
अगदीच लहानगी व्हायची.

पासाच्या प्रत्येक थेंबासोबत
एक नवं नात ती जोडायची.
खूपच पाऊसवेडी होती ती
प्रत्येक सर पावसाची ओंजळीत भरायची.

– प्रशांत
१६/०७/२०१०

#ManachaCanvas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *