निघालो आता मी पंढरी,
ध्यास विठुचा मनाला ।
हरी नामाचा गजर,
अंगी माझ्या ह्या भिनला ।।
वाट आता ही पंढरी,
ध्यास आता हा पंढरी ।
मनोमनी आता माझ्या
आस लागली पंढरी ।।
पाहिन विठूवेडा
आता मी जाऊन पंढरी ।
गळा भेट मी जाऊन
तयाची घेईन पंढरी ।।
भक्तीत मी विठुच्या
वाहून जाईन मी पंढरी ।
डोळे भारूनिया आता
मीही पाहिन पंढरी ।।
– प्रशांत
17 जून 2017