ओठांवरती अडखळलेला शब्द असू दे,
की रातीत गुंफलेलं स्वप्न असू दे,
पण दोन्हीचा शेवट मात्र तुच असतेस ।।
एखादी वेडी कविता असू दे,
वा एखादं सुरेख चित्र असू दे,
पण दोन्हीचा अर्थ मात्र तूच असतेस ।।
खुलणारी कळी असू दे,
किंवा बहरणारा वृक्ष असू दे,
पण दोन्हीचा मोहर मात्र तूच असतेस ।।
बरसणारा पाऊस असू दे,
अथवा निथळ सुंदर झरा असू दे,
पण दोन्हीचा नाद मात्र तूच असतेस ।।
प्रकाशमय झालेला दिस असू दे,
वा काळीकुट्ट रात असू दे,
पण दोन्हीच्या उदरात मात्र तूच असतेस…..
प्रशांत
03 ऑगस्ट 2017