स्टेशनवरची भेट.
गाडीने स्टेशन सोडावं
नि सार स्टेशन रित व्हावं.
तुझ्या नि माझ्यासवे
तिथं कोणीच न उराव.
मी तिथं असल्याचं
तुला ठाऊक नसाव.
आपण एकटे आहोत
या भीतीनं तू घाबरून जावं.
अश्रूंनी तुझ्या गालावर ओघळण्यापूर्वी
मी तुझ्या नजरेस पडावं
जणू कैक जन्माच नात
असल्यासारखं तू माझ्या कवेत यावं.
पण जस हे रोज स्वप्नात घडत ना
तस कधीतरी सत्यात ही घडावं.
– प्रशांत
#ManachaCanvas