जुना नि नवा प्रवास

जुना नि नवा प्रवास

प्रवास हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा भाग बनला आहे.
कधी कामासाठी, कधी सहल, कधी उगाच, कधी निकड.
वाहतुकीच्या सोयी वाढल्या, साधनं वाढली. आपण प्रवास करू लागलो.

काल बस मधून येताना घडलेला एक प्रसंग.

काल गावकडून पुण्याला निघालो. बाजूच्या सीटवर एक काका बसले होते. कात्रज घाट सुरु झाला. काका सांगू लागले, अरे एके काळी इथे खूप हिरवी गार झाड होती, खूप सारे पक्षी नि प्राणी.
कधी कात्रज घाट लागतोय अस वाटायच.
पण आजकाल कधी संपतो अस होत.

मी कुतूहलाने विचारल, अस का हो काका?

तेंव्हा काका म्हणाले, आता घाट हिरवळीपेक्षा  दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, हॉटेलच्या शिल्लक राहिलेल्या कचर्‍याने भरून गेलाय.

माणसाला सगळे काही शुद्ध लागते पण विचार बुरसटले माणसाचे. सार्वजनिक म्हणजे लोकांचे पण आपण लोक नाही.
आपली शारीरिक प्रकृती नीट ठेवताना आपण या धरणी मातेच्या प्रकृतीचा विचार करण पार विसरलो रे बाळा आपण.
पर्यावरणात असमतोल निर्माण झालाय अस म्हणण चुकीच ठरेल. पर्यावरणात असमतोल आपण निर्माण केलाय.

सकाळी हवा शुद्ध असते, ती मिळवायला गाडी घेऊन जातो आपण. आपल्या मागच्याला आपण शुद्ध कार्बन डाय-ऑक्साइड पाजतो नि आपल्या पुढचा आपल्याला. खर की नाही.

स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरण विसरून जाणार्‍या माणसाला ही धरणी माय पण विसरत चाललीय.
आता तिला हवा तेवढा पाऊस ती पाडते, ती माणसाने केलेली घाण धुऊन काढण्यासाठीच. डोंगर जागा सोडतोय, ते ही माणसाला आपली जागा दाखवण्यासाठी. बाळा मला माहीत नाही तुला काय वाटल असेल. पण मला पुढच्या पिढीची खूप काळजी वाटते.  मोबाईलला स्टेटस ठेवण्यासाठी तरी यांनी झाड लावली तरी खूप फरक पडेल.
माझी बडबड एरंडाचे गुऱ्हाळ आहे ती संपणार नाही. पण स्वारगेट आल, चल उतरू.

आम्ही दोघे पण आपापल्या दिशेला निघालो पण काका खूप मोठ दिशादर्शन करून गेले हे मात्र नक्की. आता आपली विचार करण्याची वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही.

Thought behind the post :

This is about the differentiation between two era's. One where people used to love to travel hill side due to greenery and nowadays people are avoiding to travel hillside due to garbage thrown out everywhere.
Trying to put together a conversation which can explain how things used to and how they are or will be.

#जपा_स्वतःला_जपा_समाजाला