अन् आसवांनी मी चिंब भिजावे.

पाऊस यावा, डोलावी पाती
अन् वाऱ्याने बेभान व्हावे.
परि, तू न यावे, भेटीस माझ्या
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.

दाही दिशांनी, रंग पांघरावा
नक्षत्रांनी तूचसाठी साजावे.
परि, तू न यावे, स्वप्नातही आता
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.

हसून उमलावी, पुन्हा फुलेही
डोई एखादे, तू ही माळावे.
परि, मज न कळवा, गंध ही त्याचा
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.

बस झाले, अबोले सारे
बस झाले, आता दुरावे.
वाटत राहते मनास माझ्या
बस परतुनी, तू क्षणिक यावे.

अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.

– प्रशांत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *