एकांताचा सन्यास घे……

कसं तुला आमच्या,
भेटीविना जमतं.
कसं तुझ मन
आमच्याविना रमत.

तुला पाहून आता,
किती महिने झाले.
उन्हाळ्यासोबत पावसाळे पण,
असेच मोगोमाग गेले.

ठरवशिल तू तर
अवघड काहीच नाही.
पण कधीकधी वाटत
तुलाच, भेटीची इच्छा नाही.

माणूस म्हणून आम्ही
खूप चूका केल्यात.
मायबाप आहेस तू
म्हणून माफही झाल्यात.

तुला हवी ती तू
शिक्षा आम्हाला दे.
पण पहिल्यासारखी जोमात
आषाढी भरू दे.

कोरोनासुर राक्षसाच्या,
नरडीचा तू घोट घे.
उघड गाभाऱ्याच कवाड
अन् तडक बाहेर ये.

पण देवा आता
या, एकांताचा सन्यास घे.

प्रशांत
(२०/०७/२०२१)
#मनाचा Canvas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *