जात होतो दरावरून म्हटंल
आवाज देऊन बघाव.
कंटाळला असशील आत बसून
म्हटलं सोबत येतोय का पहावं.
संचार बंदी आहे खरी
पण आपण गल्ली बोळातून जाऊ.
वाजवू एखाद्या हॉटेलचे शटर
नि गुपचूप आत जाऊन खाऊ.
बघ विचारून रखुमाईला
परत माझ्यावर रागवायची.
म्हणेल मी केला होता स्वयंपाक
काय गरज होती बाहेर जायची.
बरं बाहेर येशील तेंव्हा
मास्क तेवढा लाऊन ये.
भेटतील काही विना मास्क
त्यांचा न बोलताच निरोप घे.
बरं मग बा विठ्ठला येणार,
असशील तर ये मग तडक.
यायची एखादी राऊंडला गाडी
नि साहेब बसतील माझ्यावर चिडत.
असेल रंगला कुठ कीर्तनाचा फड
तर बसू थोडा वेळ.
बघ तूही भक्तांसोबत
घालवून थोडा वेळ.
आली तिसरी लाट तर
परत फक्त नामस्मरण करेल मी दुरून.
आहेत थोडा वेळ म्हणून म्हणतोय
त्याला काय होतंय, चल येऊ जरा फिरून…….
– प्रशांत