स्वप्न असो वा भास परि,
दोन्हींत तुच तू असतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।
दिस असो वा रात परि,
आठवणीत तुच तू असतेसच ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।
काव्य असो वा गद्य परि,
तयाचा अर्थ तूच तू असतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।
संपून गेलो तुजविण मी परि,
मागे तूच तू उरतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
त्या विसरण्यातही तुच तू असतेस ना ।।
– प्रशांत
०2 ऑगस्ट 2017