यंदा
ना टाळ मृदुंगाच्या जयघोष,
ना हरी नामाचा गजर.
यंदा, अडकलो मी असा,
दूर राहिले पंढरपूर.
ना घेतला पताका,
ना तुळस डोईवरी.
यंदा जमलेच नाही,
मला यायला पंढरी.
ना चंद्रभागा स्नान,
ना वाखरीचे रिंगण.
यंदा पंरपरा साऱ्या,
देवा गेल्यात मोडून.
पोहचवेन माझी वारी,
मी वाऱ्याच्या पाठीवरी.
यंदा, ना जमल रे मला,
देवा यायला पंढरी.
भक्तीत माझे नाही
देवा, कसलाच रे कसूर
यंदा का ठेवलेस मला,
तुझ्यापासुन तू दूर.
एकच रे इनवणी
देवा, तुझ्या चरणाशी,
असे दिस रे, परत,
नको दाखवू, तू आम्हासी.
घेतो दुरूनीच मी यंदा
देवा, ओठी तुझे नाव,
पण मन माझे सारखे
घेते पंढरीची धाव.
देवा जरी दुरावा हा देहाचा
परी, आत्मा तुझाच रे दास.
सारे लावशील, तू मार्गी
मला पूर्ण विश्वास.
– प्रशांत
#ManachaCanvas
Category: ManachaCanvas
पण, जगाला मात्र सांगायचं राहून गेलं…..
पण, जगाला मात्र सांगायचं राहून गेलं…..
तू भेटायच्या आधी जे, कित्येक वेळा
मी स्वतःला सांगितलं.
खूप प्रयत्न करूनही
पण, तुला मात्र सांगायचं राहून गेलं…….
पहिल्यांदा पाहिलं तुला तेंव्हा,
मन तुझ्या मागे, कसं वाहत गेलं.
आज वर सगळ्यांना सांगितलं
पण, तुला मात्र सांगायचं राहून गेलं…….
पहिल्यांदा बोललो तुला जेंव्हा
तेव्हा काळजात कसं धस केलं.
आज वर सगळ्यांना सांगितलं
पण, तुला मात्र सांगायचं राहून गेलं…….
पहिल्यांदा तुझ्या सोबत कॉफिला जाणं
मला किती आनंद देऊन गेलं.
आज वर सगळ्यांना सांगितलं
पण, तुला मात्र सांगायचं राहून गेलं…….
पहिल्यांदा तुझ्या पुढे व्यक्त होताना कॉलेजचं
शेवटचं वर्ष कसं सरून गेलं.
आज वर सगळ्यांना सांगितलं
पण, तुला मात्र सांगायचं राहून गेलं…….
पहिल्यांदा तुझ्यापुढे व्यक्त होऊन मी
एका चांगल्या मैत्रीला कसं शेवटचं दूर केलं.
आजवर फक्त तुला माहिती
पण, जगाला मात्र सांगायचं राहून गेलं…..
– प्रशांत
#ManachaCanvas
सुटली एकदाची…..
सुटली एकदाची…..
सुटली एकदाची,
कहाणी, तिची शेवटी.
सोडवता तिला,
सारी, माया मात्र आटली.
सरळ चालताना तिच्यासोबत
रस्ता व्हायचा वाकडा.
तिन्ही सांजेला, भेटीचा तिच्या,
असायचा ७ चा आकडा.
चढत जायची रात्र,
घेऊन तिलाच कवेत.
एका वेगळ्या अनुभवाच्या,
एका वेगळ्याच दुनियेत.
कैदाशिनच होती ती,
काळी जादू करत गेली.
अशी भिनली सवयीत,
सोडता सुटेना गेली.
आयुष्याचा घोट घेऊनच
आत्मा तिचा तृप्त झाला.
स्वतःच्या तृप्तीसाठी तिने,
देहातून आत्मा वेगळा केला.
संपली एकदाची कहाणी,
त्या दारूची शेवटी.
जीव घेऊनच मोडला,
तिने डाव तिचा शेवटी.
– प्रशांत
#ManachaCanvas
**स्टेटस**
**स्टेटस**
ठेवले जयासाठी स्टेटस
गेले उलटून 24 तास
परी त्याने काही केल्या स्टेटस
पहिलेच नाही.
तर्हेतर्हेचे कयास
कारण जाऊन घेण्यास
उत्तर मात्र कसले
मिळालेच नाही.
क्षणोक्षणी ही नजर
viewed by लिस्ट वर
परी नाव काही त्याचे
त्यात आलेच नाही
होता जेव्हा तो समोर
असूनही कित्येक वेळ
मनातले बोलायला
जमलेच नाही.
आता नुसती घालमेल
मनी यातनाही खोल
आता स्वतःला सावरणे
अशक्य होई.
म्हणुन सांगतो एकवार
ना यावी अशी वेळ
की बोलाया मनातले
जमणारच नाही.
ना लागावा कसला आधार
बोलावे थेट एकवार
ना करता कसलाही विचार,
मनातले….
– प्रशांत
22-11-2021
#मनाचा_Canvas
वाटा….
वाटा….
येऊन अचानक समोरच्या
सीटवर ती बसली.
नजरेला मिळाली नजर
नि सहजच ती हसली.
डोळे होते बोलत तिचे
ओठ होते निजलेले.
पेटले होते मनी वणवे
भूतकाळी विजलेले.
जमल्या शब्दांच्या महिफिली
अन् भान विरले जगाचे.
जाग म्हणायला राहीलच नाही
राज्य होते फक्त दोघांचे.
तिच्या लाजाऱ्या पापण्या लाजून
लाजेने खाली होत्या झुकलेल्या.
एकत्र आल्या होत्या वाटा
ज्या कुठेतरी होत्या चुकलेल्या.
– प्रशांत
१३/०९/२०१०
#ManachaCanvas
हाती पडली एक कविता……
हाती पडली एक कविता……
हाती पडली एक कविता
तुझ्याचसाठी रचलेली.
क्षणिक पलटली हजार पाने
तुझ्या विना सरलेली.
कडव्यात पहिल्या, पुन्हा जाणवला
रुसवा तू मजवरी धरलेला.
राग लटका, फसवा खोटा
चेहऱ्यावर तू कोरलेला.
कडव्यात दुसऱ्या, तूज मनवत गेलो,
मी क्षणामागोनी क्षण कैक
कळला ना मज डाव तुझा तो,
युक्त्या मी, लढविल्या अनेक.
कडव्यात तिसऱ्या, सुटला होतो
अबोला मजवरी तू धरलेला.
अलगत मी ही धरला होतो
तोल तुझा तो सुटलेला.
कडव्यात शेवटच्या उरले होते
स्मित ओठावरी तुझिया.
अंतरही सारे मिटले होते
कवेत होती तू माझिया..
हाती पडली एक कविता,
तुझ्याचसाठी रचलेली.
लेवूनी साऱ्या तुझ्याच छटा,
सोबतीस माझ्या उरलेली.
हाती पडली एक कविता…….
– प्रशांत
#ManachaCanvas
लिहायचचं राहील……
लिहायचचं राहील……
शोधत होतो कविता कॉलेजच्या
magmize मध्ये द्यायला
मला नव्हतं ठाऊक की,
मलाही जमतंय लिहायला.
कशाविषयी लिहायचे
हे मात्र सुचत नव्हते.
प्रेम, मैत्री, कॉलेज असे
विषयतर खूप होते.
प्रत्येकाविषयी चार-चार
ओली लिहून पहिल्या.
पुढं काही सुचलं नाही
म्हणून त्या तशाच राहिल्या.
तरीपण काहीतरी नवीन
लिहायला जमतंय का ते पाहिलं.
जमायचं तर सोडाच पण माझं
कविता लिहायचा राहील.
-प्रशांत
#ManachaCanvas
मी कुणी कवी नाही.
मी कुणी कवी नाही.
मी कुणी कवी नाही
मी तर फक्त लिहितो.
माझ्या भावनांना शब्दांच
रूप फक्त देतो.
कोणी म्हणत त्याला कविता
कोणाच्या लेखी असतो वेडेपणा.
म्हणूनच तर म्हणतोय ना
मला कवी सोडून काहीही म्हणा.
‘विंदा’ सारखी चव माझ्या
कवितांना कधीच नसते.
ना असतो संदीपसारखा भावनिक ओलावा
ना सलील सारखी चाल असते.
मी तर लिहितो फक्त माझ्यासाठी.
म्हणून काय मी लगेच
कवी वगेरे ठरत नाही.
कारण कवींच्या यादीत
मी कणभरही उरत नाही.
– प्रशांत
#ManachaCanvas
स्टेशनवरची भेट.
स्टेशनवरची भेट.
गाडीने स्टेशन सोडावं
नि सार स्टेशन रित व्हावं.
तुझ्या नि माझ्यासवे
तिथं कोणीच न उराव.
मी तिथं असल्याचं
तुला ठाऊक नसाव.
आपण एकटे आहोत
या भीतीनं तू घाबरून जावं.
अश्रूंनी तुझ्या गालावर ओघळण्यापूर्वी
मी तुझ्या नजरेस पडावं
जणू कैक जन्माच नात
असल्यासारखं तू माझ्या कवेत यावं.
पण जस हे रोज स्वप्नात घडत ना
तस कधीतरी सत्यात ही घडावं.
– प्रशांत
#ManachaCanvas
जुना नि नवा प्रवास

जुना नि नवा प्रवास
प्रवास हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा भाग बनला आहे.
कधी कामासाठी, कधी सहल, कधी उगाच, कधी निकड.
वाहतुकीच्या सोयी वाढल्या, साधनं वाढली. आपण प्रवास करू लागलो.
काल बस मधून येताना घडलेला एक प्रसंग.
काल गावकडून पुण्याला निघालो. बाजूच्या सीटवर एक काका बसले होते. कात्रज घाट सुरु झाला. काका सांगू लागले, अरे एके काळी इथे खूप हिरवी गार झाड होती, खूप सारे पक्षी नि प्राणी.
कधी कात्रज घाट लागतोय अस वाटायच.
पण आजकाल कधी संपतो अस होत.
मी कुतूहलाने विचारल, अस का हो काका?
तेंव्हा काका म्हणाले, आता घाट हिरवळीपेक्षा दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, हॉटेलच्या शिल्लक राहिलेल्या कचर्याने भरून गेलाय.
माणसाला सगळे काही शुद्ध लागते पण विचार बुरसटले माणसाचे. सार्वजनिक म्हणजे लोकांचे पण आपण लोक नाही.
आपली शारीरिक प्रकृती नीट ठेवताना आपण या धरणी मातेच्या प्रकृतीचा विचार करण पार विसरलो रे बाळा आपण.
पर्यावरणात असमतोल निर्माण झालाय अस म्हणण चुकीच ठरेल. पर्यावरणात असमतोल आपण निर्माण केलाय.
सकाळी हवा शुद्ध असते, ती मिळवायला गाडी घेऊन जातो आपण. आपल्या मागच्याला आपण शुद्ध कार्बन डाय-ऑक्साइड पाजतो नि आपल्या पुढचा आपल्याला. खर की नाही.
स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरण विसरून जाणार्या माणसाला ही धरणी माय पण विसरत चाललीय.
आता तिला हवा तेवढा पाऊस ती पाडते, ती माणसाने केलेली घाण धुऊन काढण्यासाठीच. डोंगर जागा सोडतोय, ते ही माणसाला आपली जागा दाखवण्यासाठी. बाळा मला माहीत नाही तुला काय वाटल असेल. पण मला पुढच्या पिढीची खूप काळजी वाटते. मोबाईलला स्टेटस ठेवण्यासाठी तरी यांनी झाड लावली तरी खूप फरक पडेल.
माझी बडबड एरंडाचे गुऱ्हाळ आहे ती संपणार नाही. पण स्वारगेट आल, चल उतरू.
आम्ही दोघे पण आपापल्या दिशेला निघालो पण काका खूप मोठ दिशादर्शन करून गेले हे मात्र नक्की. आता आपली विचार करण्याची वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही.
Thought behind the post :
This is about the differentiation between two era's. One where people used to love to travel hill side due to greenery and nowadays people are avoiding to travel hillside due to garbage thrown out everywhere.
Trying to put together a conversation which can explain how things used to and how they are or will be.
#जपा_स्वतःला_जपा_समाजाला