उषःकाल (०१ जानेवारी २०२१)

०१ जानेवारी २०२१

एकदम दचकून जाग आली, काहीतरी भयानक घडलंय असं वाटतं होत. छाती वरखाली होत होती. मोबाईल उचलला न्यूज चॅनलची वेबसाईट ओपन केली, लेटेस्ट अपडेट, लेटेस्ट न्यूज सगळं चाळून झालं. पण अशी कोणतीच बातमी नव्हती की, जी भयानक असं काही घडलय हे स्पष्ट करेल.

थोडा धीर आला, स्वप्नच होत याची खात्री झाली. पण खर सांगू खुप भयाण स्वप्न होत.

जगात कुठे तरी, एका देशाच्या कोपऱ्यात जिथं प्राण्यांची खरेदी विक्री होते त्या ठिकाणी, कसला तरी वेगळाच व्हायरस निर्माण झालाय जो, आहे तरी अगदी सध्या सर्दी खोकाल्या सारखा पण खूप घातक आहे.
त्या व्हायरस ने बघता बघता यमराजाशी कारार केला.  खूप सारे लोक या आजाराला बळी पडत आहेत. मेडिकल सायन्स पण चाट पडलंय. आता काय करायचं? पुढे कसं होणार?
त्या देशाने त्या भागात पूर्णपणे  घराबाहेर पडण्यास बधी आणली.
ज्या लोकांना साधे सर्दी, खोकला, ताप असेल त्यांना घरातून ओढून ओढून हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं. कधी नव्हे तेवढ्या प्रचंड प्रमाणात लोकांना हॉस्पिटल्स मध्ये दाखल करण्यात येत होत.
त्या देशाने शरतीचे प्रयत्न करून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

पण जोपर्यंत या आजार विषयी जगाला कळाल, तो वर हा आजार हा हा म्हणता संपूर्ण जग भर पसरला. जगाच्या मेडिकल यंत्रणेच्या पेकडात एक जोरात लाथ बसली जणू.

काही देशात यम दुतांनी थैमान घातलं, इतकं की त्यांच्या गाडीत पण जागा नव्हती, इतक्या जणांचे प्राण घेऊन जायला. अगदी हाहाकार, भीती आणि विनाश.

देश ना देश बंद झाले. कुणी एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकत होत ना कुणी येऊ.
या देशातून त्या देश्याताच काय पण हळूहळू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायला बंदी घातली गेली.
व्यापार उद्याग ठप्प झाले. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आलं.
फक्त जीवनावश्यक गोष्टी पुरविल्या जाऊ लागल्या.

सगेसोयरे दूर झाले, कॉलेज, शाळा बंद. सुख आणि दुःख यावर देखील बंधन यावं. ना सुखाच्या क्षणात ना दुःखात नातलगांना साथ देता आली. स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्न हा एकमेव उद्देश समोर राहिला.

त्यात आपल्या प्रसारमाध्यमांनी अर्थात मिडियाने या आजारच इतकं भांडवल केलं, की लोक आपल्या शिंका पण मोजायला लागले.
जणू आपण आता आज उद्यावर येऊन पोहचलो की काय अशी परिस्थिती या मिडिया ने सगळ्यांना पुढे उभी केली. एखादा आशेचा किरण जरी या मीडियाने दाखवला तर तो ही इतका निराशावादी पणाने की जणू “व्हायरस” संपला तर त यांचा धंदाच बुडेल. एवढी चांगली संधी कशी सोडेल हा मिडिया.

शक्य तितका कोपरा मिडियाने, चांगल्या गोष्टींना दाखवला. इतक्या जोमाने यांनी मृत्यू तांडव दाखवलं. की तेवढं त्या व्हारासलाही कधी नसतं जमल.
व्हायरस ने नसेल केलं, तेवढं या मीडियाने भीतीदायक वातावरण निर्माण केलं.

पण जसे हळूहळू जसजसे दिवस सरले, तसे मेडिकल फील्ड मध्ये अवल लोकांनी खुप सारे मार्ग उभे केले. लोकांचे प्राण वाचवण्यात काही प्रमाणात यश येऊ लागलं.

सुरुवातीला तर या व्हायरसच काय सुरू आहे, तेच समजत नव्हतं.
कित्येक लोक भीती पोटी याला शरण गेले. ते म्हणतात ना की, वेळ हे खूप चांगलं औषध आहे. जसं जसं लोकांना पटायला लागलं की हा आजार म्हणजे सर्दी, ताप, खोकल्याचा जरा लांबचा नातलग आहे, त्या नंतर सुरू झालं सत्र व्हायरसला नमवायच. आता लोकांच्या मनातली भीती कमी झाली होती. सर्वांना वास्तविक्ता समजून आली होती.
व्हायरसचा गोत्र मुरब्बा(बायोडाटा) जगाला कळला.

कोणत्याही लढाईची सुरुवात ही आपल्यापासून होते, हे स्वत:ला पटवून देत लोक परत नव्या उपाय योजनांचां अवलंब करत नव्याने जगायला लागले.

एकमेकांना साह्य करत साऱ्या जगाने यावर विजयच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

बघता बघता, तो दिवस आला जेंव्हा परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. रुग्ण संख्या वाढत होती पण ठीक होणाऱ्यांची संख्या ही बरोबरीत येऊ लागली. चांगल्या लसीची निर्मिती झाली. लोकांना जगण्याची नवी उमेद, नवी दिशा मिळाली.

जग एकजुटीने लढा देत होत, आणि नियती त्याला यशही.

गजर वाजला, नि या भयाण स्वप्नातून जागा झालो. पण विश्वास बसत नव्हता, इतकं भयाण स्वप्न. सगळ्या बाजूने खात्री करून घेतली की हे स्वप्नच आहे. असं कधीच सत्य असू नये.

या कल्पनितेचा एवढाच निरागस हेतू आहे की, हे सत्य उद्याच्या भूतकाळाचा भाग बनून विरून जाईल. नि कधीच परत डोकं वर काढणार नाही.

– प्रशांत

#ManachaCanvas

२०/०७/२०२०

विठ्ठल

उभा  उगे अठ्ठावीस,
नाव लेऊनी विठ्ठल,
कुणी म्हणे माऊली,
कुणाचा सखा पांडुरंग.

घ्यावे दर्शन नाम्याचे,
पाहण्या आधी हा विठ्ठल,
तुका ज्ञानाचा गजर
कणोकणी हा विठ्ठल.

मेळा लाऊनी चंद्रभागी,
आचरावा हा विठ्ठल,
टाळ मृदुंगाचा जल्लोष
गातो विठ्ठल विठ्ठल.

किती मांडले शब्दात
परि मागे उरतो विठ्ठल,
रुक्मिणी सवे नांदतो
माझ्या गावी हा विठ्ठल.

अवघी पंढरी विठ्ठल
मनी ध्यानी हा विठ्ठल
माझा सावळा विठ्ठल
बोला जय हरी विठ्ठल

– प्रशांत

तडजोड

जगाला दाखवायला जरी सगळं वरवर ठीक असलं तरी मनाला झालेले घाव कधीच भरत नाही. ओठावर जरी हसू असलं तरी मनातलं कधीच ओठावर उमलत नाही.
आयुष्य चालतं राहतं, कारण श्वास थांबत नाही.

कोणीच जिंकत नाही ना, कुणाची हार होते.
पण मनातलं द्वंव कधीच संपत नाही. प्रत्येक श्वास हे द्वंव झुंजवत जातो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.

मागे उरतो एक अनुत्तरित प्रश्न की, चूक कोणाची?
ज्याचं एक प्रश्नार्थक उत्तर असत “माझी कारण मला जगाचं ऐकायचं नाही?” नि दुसरं “का जगाची कारण त्याला काय पडलंय माझ्या आयुष्यात काय होणार आहे?”

जगाला कळत तरी असतील का मनातल्या वेदना? नि जग म्हणजे नक्की काय, नि असं कोणतं जग आहे ज्याला आपली पर्वा नाही.

जगाला धरून केलेल्या गोष्टी पण बऱ्याचदा चुकतातच ना?

जग काय म्हणेल, जगाला काय वाटेल, या सगळ्यात आपल्याला काय वाटतं, याचा विचार करतो तरी का आपण?

जग दोन्ही बाजूनी बोलतो, चांगल झालं तरीही नि वाईट झालं तरीही, जर आपण सकारात्मक विचार करून चांगलं होईल असा विचार केला नि जगाला काय वाटेल यापेक्षा आपल्याला काय वाटतं याचा विचार करून आयुष्यात पावलं टाकली तर आपलं आयुष्यावर नि त्याचं आपल्यावरच प्रेम जास्त दृढ होईल ना?

पण खरं सांगू हे वाचायला, ऐकायला खूप छान वाटत असलं तरी, प्रत्येक्षात असं काही घडत तरी का?
आपले आपले म्हणणारे जेंव्हा आपला सोडून जगाचा विचार करायला लागतात, आपल्या आनंदापेक्षा त्यांना जग काय म्हणेल हे महत्वाच वाटायला लागतं, तेंव्हा उरते ती “तडजोड”.

“स्वतः स्वतःशी केलेला एक अलिखित करार”, #तडजोड

प्रशांत
16/12/2017

इन रातोंको समज़ाये कोई

इन रातोंको समज़ाये कोई की,
इतनी मोहबत न करे हमसे,
क्योंकि वही छुटा है हमसे,
जिसने हमसे दिल लगाया है ।

सवरना तो हर हाल में,
खुद को ही पड़ता है,
क्योंकि वही दूर होता है हमसे,
जिससे साथ निभाने का वादा किया जाता है ।

बात बस किसी की यादो को
भुलाने की नही होती,
कभी कभी कमबख्त एक लम्हा ही
दिल को बेचैन बना जाता है ।।

सवर हर हाल में जाते है हम,
कहते है ना वक्त हर दर्द भुला देता है ।
बस कोई हमे वो वक्त लोटा दो
जिसकी दवा से ये दर्द भुलाया जाता है ।।

शायद अब इसी लिए
इन निंदोसे प्यार नही है कोई,
क्योंकि रातोंको को तो युही हर रोज,
बेवज़ह जगाया जाता है ।।

त्या विसरण्यातही तुच तू……

स्वप्न असो वा भास परि,
दोन्हींत तुच तू असतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।

दिस असो वा रात परि,
आठवणीत तुच तू असतेसच ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।

काव्य असो वा गद्य परि,
तयाचा अर्थ तूच तू असतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
श्वासात तुच तू असतेस ना ।।

संपून गेलो तुजविण मी परि,
मागे तूच तू उरतेस ना ।
कसे विसरू सांग तुला मी,
त्या विसरण्यातही तुच तू असतेस ना ।।

– प्रशांत
०2 ऑगस्ट 2017

एक वेदना….

लागलेली ती मनाला
ओढ तुझीच होती ।
स्वप्नास माझ्या वेडी
सवय तुझीच होती ।।

ना स्वप्न राहिले ते
परी सवय आजही आहे ।
वाटेवरी तुझ्या त्या
माझी नजर आजही आहे ।।

ना परतुनी येते तू
ना वाट वेगळी होते ।
परी पुन्हा पुन्हा नव्याने
तुझी आठवण जागी होते ।।

आठवणीस तुझ्या त्या
माझे एक मागणे आहे ।
सांगावे तयांनीच मजला
काय तुझे हे वागणे आहे ।।

वागणे तसे तुझे ते
जरासे वेगळेच होते ।
त्या वागण्यात माझे मी
सर्वस्व हरपिले होते ।।

तू सर्वस्व आजही माझे
परी तुज जाण तयाची नाही ।
एक वेदना तू अशी मनाची
जिचा घाव कुठेच नाही ।।

प्रशांत…

…..मात्र तूच असतेस

ओठांवरती अडखळलेला शब्द असू दे,
की रातीत गुंफलेलं स्वप्न असू दे,
पण दोन्हीचा शेवट मात्र तुच असतेस ।।

एखादी वेडी कविता असू दे,
वा एखादं सुरेख चित्र असू दे,
पण दोन्हीचा अर्थ मात्र तूच असतेस ।।

खुलणारी कळी असू दे,
किंवा बहरणारा वृक्ष असू दे,
पण दोन्हीचा मोहर मात्र तूच असतेस ।।

बरसणारा पाऊस असू दे,
अथवा निथळ सुंदर झरा असू दे,
पण दोन्हीचा नाद मात्र तूच असतेस ।।

प्रकाशमय झालेला दिस असू दे,
वा काळीकुट्ट रात असू दे,
पण दोन्हीच्या उदरात मात्र तूच असतेस…..

प्रशांत
03 ऑगस्ट 2017

मन

वरवर पाहिलं तर अगदी शांत, निथळ, निरागस पण अंतरात काय दडलंय याचा ठावठिकाणा लावणं म्हणजे अथांग सागराचा तळ शोधण्यासारखं आहे.

म्हणूनच की काय,

माझे असूनही, मला कळेना

घडते का हे असेच सारे ।

मनात उठती असंख्य लाटा,

मन भरकटते हरवून किनारे ।

जेंव्हापासून कळायला लागत, अगदी तेंव्हापासून ते या क्षणापर्यंतचा सगळा प्रवास मनाच्या कॅमेरात कैद होतो. नि मागे उरतात त्या फक्त आठवणी.

तस पाहायला गेलं, तर आपण काहीच विसरत नाही. एखादं गाठोड भराव तस फक्त आठवणी साठवत जातो. एखाद्या दिवशी अडगळीच्या खोलीत एखादी गोष्ट शोधायला जातो, पण त्या गोष्टीपर्यंत पोहचायच्या आधी काही तरी हाताला लागत, नि आपण भरकटतो. कधी कधी इतकं की, जे शोधायला आलो होतो ते बाजूलाच राहतं.

आपण बसतो वेगळाच डाव मांडून.
काही वेळानं भानावर येतो, खऱ्या जगात.
पण खरं सांगायचं झालं तर, सगळं हवंहवसं वाटत, हे कधीच संपू नये या विचारात पुन्हा एकदा भरकटण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी तसं काही होत नाही, कारण आता मनाला वर्तमानाची जाणीव झालेली असते.

सारे काही……

घालत गेलो शब्द रांगोळ्या अर्थ
तयांना न्हवता काही ।
खूप काही जरी बोलून गेलो पण
सारे काही बोललेच नाही ।।

कळाले जरी तुज बरेच काही पण
सारे काही कळालेच नाही ।।

व्यर्थ असे जरी बरेच होते पण
सारे काही व्यर्थ नाही ।।

वाटले जरी पुन्हा हे घडावे पण
सारे काही असेच नाही ।।

-प्रशांत
१०.०५.२०१७

 

आठवा तुझ्या….

गुंफले जरी कवितेत लाख मी,
त्या! मागे परी उरतात ना ।
माझ्यासवे आठवा तुझ्या,
आजही तशाच त्या झुरतात ना ।।

मांडले जरी शब्दात कितीदा,
त्या! निशद्ब परी उरतात ना ।
माझ्यासवे आठवा तुझ्या,
आजही तशाच त्या बोलतात ना ।।

साठविले जरी कोपऱ्यात एका,
त्या! बांध परी मोडतात ना ।
माझ्यासवे आठवा तुझ्या,
आजही तशाच त्या झुरतात ना ।।

जागलो जरी राती साऱ्या,
त्या! स्वप्नात परी असतात ना ।
माझ्यासवे आठवा तुझ्या,
आजही तशाच त्या जगतात ना ।।

नसलीस जरी तू, आज सोबतीला,
त्या! सोबतीस माझ्या असतात ना ।
तुझ्याही नकळत तुझ्या आठवा,
आजही सोबत माझी करतात ना ।।

– प्रशांत
24/07/2017