ज़हर पिलाना ही है कमबख्त,
तो इक दम में पिलाना ।
यूं घुट घुट से पिलाने से,
आपको क्या हासिल, है होना ।।

Prashant Teli
ज़हर पिलाना ही है कमबख्त,
तो इक दम में पिलाना ।
यूं घुट घुट से पिलाने से,
आपको क्या हासिल, है होना ।।
ना आलो तुझ्या दारी,
ना पाहिली मी वारी,
सूनी वाटली पंढरी,
आषाढीविना…..
घेतो दुरून निरोप,
न पाहता तुझे रूप,
यत्न केली मीही खूप,
तुझ भेटीसाठी…..
राउळी तू निवांत,
तुझ आवडे एकांत,
आमची ठेव भ्रांत,
देवा थोडी…..
येऊ दे, तुझे आमंत्रण,
येईल संसार सोडून,
पाहण्या तुझे मुख,
आवडीने…..
थांबतो आता थोडे,
मी एवढे बोलून,
घे पोटात चुका माझ्या
रखुमाई वल्लभा.
तुजवरी नसे राग,
तू जीवनाचा भाग,
आमच्यासाठीच पंढरीत तू,
पांडुरंगा……
प्रशांत
(२१/०७/२१)
आज झाली तुझी भेट,
डोळी पहिला मी थाट,
धन्य झालो मी देवा,
या एकादशी…….
माया तुझी ही अपार,
विठू माझा तू सुंदर
राही ना आता पारावर,
या आनंदाला…….
कोणी लहान, ना थोर,
सारी तुझीच रे लेकरं,
राहू दे तुझा हात,
या डोईवर……..
घेतो तुझा मी निरोप
होण्या संसारात एकरूप
येईन भेटाया मी तुला
पुढल्या एकादशी…….
– प्रशांत
15-Nov-2021
प्रवास होता, रोजचाच माझा
तोच रस्ता, त्याच वाटा
घडले जराशे, वेगळेच परंतु
मोह जडला या प्रवासाचा.
झाले असे एके दिनी
पहिले तुला मी खिडकीतुनी.
जीव जडला तुझ्यावरी
बाण लागला मज नजरेतुनी.
नवा झाला हा, प्रवास आता
तुझ्या दारी मी, येता जाता.
दिस कसला जो, तुजला न पाहता.
भरकटून गेली, माझी नवका.
तुला पाहिले, समोरी मी जेव्हा.
धाडसाने बोललो, तुज तेंव्हा
अवसान गळाले माझे परंतु
पाहुनी रंग, तूज चेहऱ्याचा तेंव्हा.
उत्तरे सारी सोबत ठेऊनी.
प्रश्न नवेच मज, गेलीस करुनी.
घायाळ मनाला सोबत घेऊनी
फिरतो आजही तुझ्या दारावरूनी.
आठवून पुन्हा तो प्रसंग आता
नशिबाला रोजच घालतो लाथा.
तुझ्या खिडकीच्या जवळून जाता
इतका खेळ झाला, बस तुला पाहता.
– प्रशांत
पाऊस यावा, डोलावी पाती
अन् वाऱ्याने बेभान व्हावे.
परि, तू न यावे, भेटीस माझ्या
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.
दाही दिशांनी, रंग पांघरावा
नक्षत्रांनी तूचसाठी साजावे.
परि, तू न यावे, स्वप्नातही आता
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.
हसून उमलावी, पुन्हा फुलेही
डोई एखादे, तू ही माळावे.
परि, मज न कळवा, गंध ही त्याचा
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.
बस झाले, अबोले सारे
बस झाले, आता दुरावे.
वाटत राहते मनास माझ्या
बस परतुनी, तू क्षणिक यावे.
अन् आसवांनी, मी चिंब भिजावे.
– प्रशांत
कसं तुला आमच्या,
भेटीविना जमतं.
कसं तुझ मन
आमच्याविना रमत.
तुला पाहून आता,
किती महिने झाले.
उन्हाळ्यासोबत पावसाळे पण,
असेच मोगोमाग गेले.
ठरवशिल तू तर
अवघड काहीच नाही.
पण कधीकधी वाटत
तुलाच, भेटीची इच्छा नाही.
माणूस म्हणून आम्ही
खूप चूका केल्यात.
मायबाप आहेस तू
म्हणून माफही झाल्यात.
तुला हवी ती तू
शिक्षा आम्हाला दे.
पण पहिल्यासारखी जोमात
आषाढी भरू दे.
कोरोनासुर राक्षसाच्या,
नरडीचा तू घोट घे.
उघड गाभाऱ्याच कवाड
अन् तडक बाहेर ये.
पण देवा आता
या, एकांताचा सन्यास घे.
प्रशांत
(२०/०७/२०२१)
#मनाचा Canvas
जात होतो दरावरून म्हटंल
आवाज देऊन बघाव.
कंटाळला असशील आत बसून
म्हटलं सोबत येतोय का पहावं.
संचार बंदी आहे खरी
पण आपण गल्ली बोळातून जाऊ.
वाजवू एखाद्या हॉटेलचे शटर
नि गुपचूप आत जाऊन खाऊ.
बघ विचारून रखुमाईला
परत माझ्यावर रागवायची.
म्हणेल मी केला होता स्वयंपाक
काय गरज होती बाहेर जायची.
बरं बाहेर येशील तेंव्हा
मास्क तेवढा लाऊन ये.
भेटतील काही विना मास्क
त्यांचा न बोलताच निरोप घे.
बरं मग बा विठ्ठला येणार,
असशील तर ये मग तडक.
यायची एखादी राऊंडला गाडी
नि साहेब बसतील माझ्यावर चिडत.
असेल रंगला कुठ कीर्तनाचा फड
तर बसू थोडा वेळ.
बघ तूही भक्तांसोबत
घालवून थोडा वेळ.
आली तिसरी लाट तर
परत फक्त नामस्मरण करेल मी दुरून.
आहेत थोडा वेळ म्हणून म्हणतोय
त्याला काय होतंय, चल येऊ जरा फिरून…….
– प्रशांत
ठेवले जयासाठी स्टेटस
गेले उलटून 24 तास
परी त्याने काही केल्या स्टेटस
पहिलेच नाही.
तर्हेतर्हेचे कयास
कारण जाऊन घेण्यास
उत्तर मात्र कसले
मिळालेच नाही.
क्षणोक्षणी ही नजर
viewed by लिस्ट वर
परी नाव काही त्याचे
त्यात आलेच नाही
होता जेव्हा तो समोर
असूनही कित्येक वेळ
मनातले बोलायला
जमलेच नाही.
आता नुसती घालमेल
मनी यातनाही खोल
आता स्वतःला सावरणे
अशक्य होई.
म्हणुन सांगतो एकवार
ना यावी अशी वेळ
की बोलाया मनातले
जमणारच नाही.
ना लागावा कसला आधार
बोलावे थेट एकवार
ना करता कसलाही विचार,
मनातले….
– प्रशांत
22-11-2021
#मनाचा_Canvas
संपली एकदाची, कहाणी शेवटी
सुटली एकदाची,
कहाणी, तिची शेवटी.
सोडवता तिला,
सारी, माया मात्र आटली.
सरळ चालताना तिच्यासोबत
रस्ता व्हायचा वाकडा.
तिन्ही सांजेला, भेटीचा तिच्या,
असायचा ७ चा आकडा.
चढत जायची रात्र,
घेऊन तिलाच कवेत.
एका वेगळ्या अनुभवाच्या,
एका वेगळ्याच दुनियेत.
कैदाशिनच होती ती,
काळी जादू करत गेली.
अशी भिनली सवयीत,
सोडता सुटेना गेली.
आयुष्याचा घोट घेऊनच
आत्मा तिचा तृप्त झाला.
स्वतःच्या तृप्तीसाठी तिने,
देहातून आत्मा वेगळा केला.
संपली एकदाची कहाणी,
त्या दारूची शेवटी.
जीव घेऊनच मोडला,
तिने डाव तिचा शेवटी.
– प्रशांत
पाऊसवेडी
खूपच पाऊसवेडी होती ती
प्रत्येक सर पावसाची ओंजळीत भरायची.
न बरसता जर गेले कधी ढग तर
त्यांच्यावर उगाचात रुसवा धरायची.
आभाळभरून आल्यावर अगदी
नवख्या कळीसारखी खुलायची.
पावसात चिंब भिजताना
थंडगार वाऱ्यासोबत झुलायची.
बरसणाऱ्या धरा अंगावर
झेलताना शहारून जायची.
‘येरे येरे पावसा…’ म्हणत तर
अगदीच लहानगी व्हायची.
पासाच्या प्रत्येक थेंबासोबत
एक नवं नात ती जोडायची.
खूपच पाऊसवेडी होती ती
प्रत्येक सर पावसाची ओंजळीत भरायची.
– प्रशांत
१६/०७/२०१०
#ManachaCanvas